About Mandal

प्रख्यात तिर्थक्षेत्र श्री महागणपतीच्या टिटवाळातील सामाजिक बांधिलकी जपणारा सार्वजनिक गणेशोत्सव …

लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्व:गणेशोत्सवाचे शताब्दी वर्षाचे औचित्य साधुन मांडा टिटवाळा या महागणपतीच्या पावन भूमीत सन १९९२ साली समाजधुरिणी अश्या प्रदिप मोहनलाल मिश्रा यांनी श्री छत्रपति शिवाजी चौक मित्र मंडळाची मुर्हुतमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सवा च्या माध्यमातुन समाजप्रबोधन, सामाजिक नागरी समस्यांना वाचा फोडणारे एक सक्षम व्यासपिठ, वैदिक सनातन परम्परेची जपवणूक, शैक्षणिक सुधार, स्वच्छता यासह नागरिकांचा ‘सिविक सेन्स’ जागृत करण्याचे उद्दीष्ट ठेवुन मंडळाचे प्रमाणिक प्रयत्न सुरु आहेत.

आपल्या ध्येयाप्रती समर्पित भावना ठेवुन श्री छत्रपति शिवाजी चौक मित्र मंडळच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावा हा सदय परिस्थितीवर आधारित असतो. पौराणीक मंदिराचा इतिहास उलगडणारा देखाव्यापासून जगातील सर्वात उंच शिखर “एवरेस्ट” सर करणारे श्री सुरेंद्र चव्हाणांचा गौरव दर्शविणारी सजावट विलोभनिय अशी होती. शिर्डीच्या साईबाबांच्या द्वारकामाईच्या भव्य देखाव्यापासून महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचा नयनरम्य देखावा हा परिक्षेत्रातील श्री गणेशभक्तांसाठी प्रबोधनाचा, ज्ञानाचा आनंददायी ठरला आहे.  मंडळ  देखाव्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न निरंतर करित आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून टिटवाळा येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांची आरक्षणाची सुविधा असो किंवा स्टेशनपरिसरात शुन्य कचरामोहिम प्रभाविपणे राबविण्यासाठी कचराकुंडीची उपलब्धता करून देण्यात मंडळ नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. पर्यावरण साक्षरता हे उद्दीष्ट ठेवून वृक्षारोपणाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा उपक्रम ही संपन्न करण्यात येतो.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील ‘अं प्रभाग समितीवर मंडळाचे सभासदाची नामनियुक्त सदस्य ‘ म्हणून निवड होणे. तसेच तात्कालीन ठाणे जिल्हा पोलिस अधिक्षक कै. श्री. अशोक कामटे साहेब ह्यांचा शुभहस्ते मंडळाला गौरविण्यात येणे हिच मंडळाची उपलब्धी मानावी लागेल.